उपपदे A,AN आणि THE चा उपयोग शिका.
इंग्रजी भाषेत A,AN आणि THE हि तीन उपपदे आहे. त्या पैकी A आणि AN यांना अनिश्चितवाचक उपपदे ( INDEFINITE ARTICLES ) म्हणतात, तर THE या उपपदाला (DEFINITE ARTICLE) म्हणतात.
इंग्रजीत A,E,I,O,U हे पाच स्वर आहेत, आणि २१ व्यंजने आहेत.
A,AN आणि THE चा उपयोग
चला तर बघूया A,AN आणि THE चा वापर. मित्रांनो वाक्यानं मध्ये Article म्हणजे A,AN आणि THE चा वापर तेव्हाच होतो असतो जेव्हा त्याचा सोबत कोणतं Noun (संज्ञा) राहील.
तर चला आपण ते उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ.
उदा. १) हा एक आंबा आहे. This is a mango. २) हा एक सफरचंद आहे. This is an apple.
येथे बघा आंबा आणि सफरचंद हे एका फळाचं नाव आहे, आणि नामाच्या पुढे आपण Article (A,AN,THE) लावतो. म्हणून A mango लिहाल आणि An apple लिहाल.
आता बघा तुम्ही म्हणाल येथे Mango च्या पाहिलं A का लावला आणि Apple च्या पाहिलं An का लावला असं का?
तर त्या साठी पाहिलं तुम्हाला स्वर आणि व्यंजन ध्वनी समजून घ्यावे लागतील.
(स्वर-Vowels)
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:
(व्यंजने-Consonants)
क,ख, ग, घ, ड:, च, छ, ज, झ, ज्, ट, ठ, ड, ढ,
ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल,
श, ष, स, ह, ळ, क्ष, त्र, ज्ञ, श्र
Before we start, pay attention to:
जर Noun ची सुरुवात स्वर च्या ध्वनी (उच्चारण) ने होत असेल तर आपण AN चा वापर करतो. आणि जर Noun ची सुरुवात व्यंजन च्या ध्वनी (उच्चारण) ने होत असेल तर आपण A चा वापर करतो. जसे कि खालील उदाहरण बघा.
A
१) उदा. हा एक आंबा आहे. This is a mango.
ह्यात बघा Mango (मॅन्गो) पुढे आपण Article A लावला कारण Mango (मॅन्गो) च उच्चारण म पासून होत आहे. आणि मॅ हे व्यंजन (Consonant)आहे.
म्हणजे तुम्हाला समजलं असेल ज्याचे उच्चारण व्यंजन राहील (क,ख, ग, घ, ड:, च, छ…. ) तेव्हा आपण A हे Article वापरायच.
काही उदाहरणे अजून समजण्यासाठी
A boy बॉय “ब” हि व्यंजन ध्वनी आहे म्हणून A लावला. Consonant Sound (ब) so used “a”
A year यीयर “य” हि व्यंजन ध्वनी आहे म्हणून A लावला. Consonant Sound (य) so used “a”
A union यूनियन “य” हि व्यंजन ध्वनी आहे म्हणून A लावला. Consonant Sound (य) so used “a”
AN
२) उदा. हा एक सफरचंद आहे. This is an apple.
ह्यात बघा Apple (अँपल) पुढे आपण Article An लावला कारण Apple (अँपल) च उच्चारण म पासून होत आहे. आणि अँ हे स्वर (Vowel) आहे.
म्हणजे तुम्हाला समजलं असेल ज्याचे उच्चारण स्वर राहील (अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:
) तेव्हा आपण An हे Article वापरायच.
काही उदाहरणे अजून समजण्यासाठी
An orange ऑरेन्ज “ऑ” हि स्वर ध्वनी आहे म्हणून An लावला. Vowel Sound (ऑ) So used “An”
An MLA एम एल ए “ए” हि स्वर ध्वनी आहे म्हणून An लावला. Vowel Sound (ए) So used “An”
An honest ऑनेस्ट “ऑ” हि स्वर ध्वनी आहे म्हणून An लावला. Vowel Sound (ऑ) So used “An”
Tips
An चा प्रयोग -: जर पुढच्या शब्दाची सुरुवात स्वर ध्वनी ने झाली तर An चा प्रयोग करावा.
A चा प्रयोग -: जर पुढच्या शब्दाची सुरुवात व्यंजन ध्वनी ने झाली तर A चा प्रयोग करावा.
Use of Article The
उपपद The चा उपयोग शिका.
Before we start, pay attention to:
जर Noun ची सुरुवात स्वर (अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:
) च्या ध्वनी (उच्चारण) ने होत असेल तर आपण The ला आपण “दी” बोलणार The will be pronounced as “thee” (दी) . आणि जर Noun ची सुरुवात व्यंजन (क,ख, ग, घ, ड:, च, छ…. ) च्या ध्वनी (उच्चारण) ने होत असेल तर आपण The ला “द” बोलणार The will be pronounced as “the” (द) .
जसे कि खालील उदाहरण बघा.
The umbrella – दी अम्ब्रेला
The ear – दी इअर
The Army – दी आर्मी
वरील उदाहरणा कडे बघा ह्या सर्व वर्ड चे उच्चारण (अ, इ, आ) असे सुरु होतंय आणि मी जसे तुम्हाला सांगितलं कि ज्याचे उच्चारण स्वर (अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:) राहील तेव्हा आपण The ला दी उच्चारण करणार.
The ला “द” बोलायचं The will be pronounced as “The” (द)
जर “The” पुढील शब्दाची सुरुवात “व्यंजन” (क,ख, ग, घ, ड:, च, छ…. ) ध्वनी ने झालेली असेल तर The चा “द” उच्चारण करणार.
जसे कि The university – द युनिव्हर्सिटी.
येथे बघा “U” हा स्वर आहे पण त्याच उच्चारण (यू) ने होत म्हणून आपण The च “द” उच्चारण करणार.
The year – द यीयर
The Ganga – द गंगा
Examples -:
The boy बॉय ब ही व्यंजन ध्वनी आहे म्हणून द बोलायचं Consonant sound “ब” so pronounced as “The”.
The pen पैन पै ही व्यंजन ध्वनी आहे म्हणून द बोलायचं Consonant sound “पै” so pronounced as “The”.
“The” चा प्रयोग कुठे करायचा.
The या निश्चितता वाचक उपपदाचा उपयोग
१) जगातील एकुलत्या एक गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी “The” या उपपदाचा उपयोग करतात.
उदा. The Sun, The Moon, The Earth, The Sky.
२) सर्व दिशांच्या पूर्वी The हे उपपद वापरतात.
उदा. The East, The West, The North, The South.
३) धर्मग्रंथ, महाकाव्य, प्रसिद्ध पुस्तके व वर्तमानपत्रे यांच्या नावाच्या आधी The हे उपपद वापरतात.
उदा. The Ramayan,The Bible, The Geeta, The Koran, The Sakaal, The Lokmat, The Loksatta.
4) संगीत साहित्यापुढे The उपपद वापरतात.
उदा. The flute, The tabala, The golden harp.
५) महान व्यक्तींच्या आणि देश भक्तांच्या नावापुढे The वापरतात.
उदा. The Bhagat Singh, The Vivekanand.
६) एकवचनी सामान्य नाम जर त्या विशिष्ट जातीबद्दल माहिती सांगत असेल तर The हे उपपद वापरावे.
उदा. The cow is a useful animal. (संपूर्ण गाईन बद्दल बोललं जात आहे )
७) विशिष्ठ व्यक्तीबद्दल
उदा. The boy is a beautiful.
उपपदाचा उपयोग कुठं होत नाही ?
१) अनेक वचनी नामापूर्वी उपपद वापरत नाहीत.
उदा. A bird is flying, Birds are flying.
येथे Bird च्या पुढे Article A लावलं पण जेव्हा Birds अनेकवचन आलं तेव्हा Article नाही लावलं.
२) मोजता न येणाऱ्या नामापूर्वी उपपद वापरत नाहीत.
उदा. a) The news (Incorrect)
News (Correct)
b) The money (Incorrect)
Money (Correct)
c) The information (Incorrect)
Information (Correct)
3) भाषेच्या नावापुढे उपपद वापरू नये.
उदा. I speak English. (Correct)
I speak the English. (Incorrect)
४) नामाच्या हुदद्यापूर्वी उपपद वापरू नये.
उदा. Doctor Patil (Correct)
The doctor patil (Incorrect)
५) विशेषनाम किंवा व्यक्तिवाचक नामपूर्वी उपपद वापरत नाहीत.
उदा. The Shrikant (Incorrect)
Shrikant
६) पदार्थ वाचक नामापूर्वी उपपद वापरत नाहीत.
उदा. a) The water (Incorrect) b) The milk (Incorrect) c) The gold (Incorrect)